पंधरा दिवसांत तीन हजार बांधकाम मजुरांची नोंदणी

पिंपरी – कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने 15 दिवसांत तीन हजार पेक्षा अधिक मजुरांना नोंदणी फॉर्म भरण्यासाठी मदत करण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची नोंदणी झाली असल्याची माहिती घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे यांनी दिली.

बांधकाम मजुरांसाठी कल्याणकरी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. मंडळाकडे कोट्यवधी रुपये निधी जमा असून बांधकाम मजुरांची नोंदणी नसल्यामुळे हा निधी पडून आहे. या निधीचा उपयोग बांधकाम मजुरांसाठी व्हावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने 28 कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. तसेच, 23 फेब्रुवारी ते 23 मार्च दरम्यान निशेष नोंदणी करण्यात आली.

कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पिंपरी-चिंचवड शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील नोंदणी सुरु आहे. बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी गौतम सरवदे, बळीराम काकडे, धर्मराज जगताप, प्रल्हाद कांबळे, चेतन पाटणकर, नंदा उदमले, अशोक धोत्रे, भीमाशंकर शिंदे, मुक्तीराम जावळे, रोहित गायकवाड, अरुण रामटेके, प्रवीण निकम, गोविंद राठोड, योगेश कोमलकर, अनिकेत कांबळे, ताराचंद गोफणे यांनी मजूर नाका आणि बांधकाम साईटवर जाऊन बांधकाम मजुरांच्या बैठका घेतल्या. 23 मार्च रोजी विशेष नोंदणीची मुदत संपत आली असता 10 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती सहायक कामगार आयुक्त यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)