पंतप्रधान मोदी हे भगवान विष्णूचे अवतार 

भाजप प्रवक्‍त्याने केलेल्या उल्लेखावर विरोधकांकडून टीकेची झोड 

मुंबई – प्रदेश भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना त्यांना थेट भगवान विष्णूचे अकरावे अवतार म्हटले. मात्र, त्या उल्लेखामुळे विरोधकांनी वाघ यांच्यावर टीकेची झोड उठवली.

-Ads-

वाघ यांनी ट्विटरवर मोदींचा उल्लेख विष्णूअवतार म्हणून केला. त्यावरून एका वृत्तवाहिनीने संपर्क साधल्यावर वाघ यांनी त्यांच्या ट्विटचे समर्थन केले. मोदींच्या रूपाने देवासारखा नेता लाभणे हे देशाचे भाग्य असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, विरोधकांनी वाघ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

भाजप प्रवक्‍त्याने केलेला उल्लेख हा देव-देवतांचा अवमान असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली. वाघ यांच्या कृतीतून भाजपची हीन संस्कृती प्रतिबिंबित होते, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला. तर अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असणाऱ्या वाघ यांच्याकडून अशाप्रकारची कृती अपेक्षित नाही. त्यांचे पदवी प्रमाणपत्र खरे आहे का ते तपासण्याची गरज आहे, अशी खिल्ली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडवली.

अवधूत वाघ
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)