मोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती 

नवी दिल्ली – भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकते, अशी भीती पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हंटले, नुकतेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशामध्ये २०१९ मध्ये राजकीय फायद्यासाठी भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

शेख राशिद म्हंटले कि, लोकसभा निवडणुकीमुळे २०१९ हे वर्ष राजकारणासाठी महत्वपूर्ण वर्ष आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोदींना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर नाराज मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी पाकिस्तानी सीमांवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, २९ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषा पार करत भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. परंतु, पाकिस्तानने कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचे म्हंटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)