‘पंतप्रधान मोदी हे तर २१ व्या शतकातील आंबेडकर’

नवी दिल्ली – उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. केंद्राच्या १० टक्के आरक्षणाच्या निर्णयाने सामान्य वर्गातील आर्थिक परिस्थिती नसलेल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. हा निर्णय सबका साथ, सबका विकास या दिशेने उचललेले पाऊल आहे, असे विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे. ते म्हणाले कि, नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील आंबेडकर आहेत. ते स्वतः गरीब आई-वडिलांचे पुत्र आहेत. त्यांनी समाजातील सर्व वर्गातील गरीबांबद्दल विचार केला आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले कि, देशात अनेक वर्षांपासून सामान्य वर्गातील आर्थिक मुद्यावर आरक्षण देण्याची मागणी चालू आहे. या निर्णयामुळे त्या सर्वांना लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)