पंतप्रधान मोदीं लंडनहून जर्मनीला रवाना – दौऱ्यात अचानक बदल

लंडन (इंग्लंड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यात अचानक बदल करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या बदलानुसार पंतप्रधान लंडनहून सरळ जर्मनीला रवाना होणार आहेत. जर्मनीत ते जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मॉर्कल यांची भेट घेतील. दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान खाकान अब्बासी यांची नरेंद्र मोदी भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खाकान यांची मोदींनी आज भेट घेतली नाही, आणि उद्या त्यांची भेट होण्याची शक्‍यता नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांग़ितले.

भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची शेवटची भेट डिसेंबर 2015 मध्ये झाली होती. अफगाणिस्तानहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकपणे पाकिस्तानला गेले आणि त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. नवाज शरीफ यांच्या नातवाच्या विवाह सोहऴयात पंतप्रधान सहभागी आले होते.
जानेवारी 2016 मधील पठाणकोटवरील दहशतवादी हल्ला आणि त्याव वर्षी सप्टेंबर महिन्यातील उरी येथील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झालेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील बातमीपत्र वाचण्यात आले पंडित नेहरूंना जागतिक शांतिदूत म्हणून मिरवून घेण्याची आस लागली होती त्या कारणानेच देशाची सर्वांगीण प्रगती कासवाच्या गतीने झाली आज श्री मोदी ह्यांना संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची आस लागली असावी तेव्हा साहजिकच वरील प्रकारे त्यांच्या परदेश वारीत वरील प्रकारचा बदल होणे स्वाभाविक समजावा लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)