पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींनी फटकारले 

नवी दिल्ली – राजस्थानमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणे काँग्रेस जेष्ठ नेते सी. पी. जोशी यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना आज अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या वक्तव्याकरीता सी.पी. जोशी यांना फटकारले. ‘सी.पी जोशी यांचे वक्तव्य काँग्रेसच्या मूल्यांच्या विरोधात असून पक्षातील कोणत्याही नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करू नये’, अशी सूचना राहुल गांधी यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते सी.पी जोशी
उमा भारती आणि मोदींचा धर्म कोणता?, असा सवाल त्यांनी विचारला होता. ऋतंभरा यांची जात कोणाला माहित आहे का?, या देशात धर्माबद्दलची माहिती केवळ ब्राह्मणांनाच आहे, असे त्यांनी म्हटले होते.

-Ads-

राहुल गांधी म्हणाले कि, सी. पी. जोशी यांचे विधान पक्षाच्या मूल्याच्या मूल्यांच्या विरोधात आहे. पक्षातील कोणत्याही नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करू नये. काँग्रेसचे सिध्दांत आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून जोशी यांना आपली चूक लक्षात येईल. या वक्तव्याचा त्यांनी खेद व्यक्त करायला हवा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी यांच्या सूचनेनंतर सीपी जोशी यांनी ट्विट करत आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हंटले कि, काँग्रेसचे सिध्दांत आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत माझ्या वक्तव्याने कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यासाठी खेद व्यक्त करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)