पाकच्या नव्या परराष्ट्रमंत्र्याचा दावा

नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. इम्रान खान यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथ ग्रहणानंतर आज त्यांच्या कॅबिनेट मंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री व पाकिस्तान तहेरिक-ए-इंसाफ पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठा दावा केला आहे. सोबतच अप्रत्यक्षपणे भारतालाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

शाह महमूद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. इस्लामाबादमध्ये शपथ ग्रहणानंतर महमूद कुरेशी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात हा दावा करण्यात आला.

ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय चर्चा होणे गरजेचे आहे. काश्मीरप्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून त्यामुळे दोन्ही देशांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाकिस्तान आणि भारत दोन्ही शेजारी देश असून दोन्हीही देश अण्वस्त्र सज्ज आहेत, असेही महमूद कुरेशी यांनी नमूद केले.

दरम्यान, इम्रान खान यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा देणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहले होते. याच पत्राच्या आधारावर शाह महमूद यांनी चर्चेचा दावा केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)