पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर डॉक्‍टर्स नाराज

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये केलेल्या एका वक्‍तव्यावर डॉक्‍टर्स नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी एका खुल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे. एमसीए (मेडिकल कन्स्टल्टंट्‌स असोसिएशन-मुंबई) आणि आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) ने पंतप्रधानाना खुले पत्र लिहून त्यांच्या वक्‍त्यव्याचा निषेध केला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याने डॉक्‍टर्सना अपमानित केले आहे. त्यामुळे डॉक्‍टर्सबद्दल असणारा सद्भाव आणि आदर कमी झाला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याचा पुन्हा एकदा विचार करावा असे पत्रात सांगण्यात आले आहे.

भारत की बात सब के साथ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींने संपूर्ण जगाशी संवाद साधला. त्यात डॉक्‍टरांच्या भ्रष्टाचाराबाबत ते म्हणाले, की परदेशी फार्मास्युटिकल कंपन्यांना प्रमोट करण्यासाठी डॉक्‍टर्स परदेशातील परिषदांमध्ये सहभागी होतात. त्यावर टिप्पणी करताना डॉक्‍टर्सनी म्हटले आहे, की ज्या देशातील 70 टक्के वैद्यकीय प्रणाली भारतीय डॉक्‍टर्स चालवतात अशा देशात पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे. औषधांच्या किमती निश्‍चित करण्याचा अधिकार सरकारकडे आहे, आमच्याकडे नाही. आणि परिषदा फार्मास्युटिकल कंपन्या आयोजित करत नाहीत; असे आयएमएचे डॉक्‍टर विनोद शर्मा यांनी म्हटले आहे. काही डॉक्‍टर्स असे असतीलही; पण पंतप्रधानांच्या वक्तव्याने डॉक्‍टर्सची प्रतिमा मलीन झाली आहे, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)