पंतप्रधान मोदींच्या चुकांमुळे काश्‍मीर जळतोय : राहुल गांधी 

उज्जैन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्‍मीरबाबत अनेक चुका केल्या. त्यामुळे ते राज्य जळतेयं, असे टीकास्त्र कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी सोडले. विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये कॉंग्रेसच्या सभेत बोलताना राहुल यांनी विविध मुद्‌द्‌यांवरून मोदींवर निशाणा साधला. अलिकडच्या काळात दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देऊन ते म्हणाले, मोदी सरकारने दहशतवाद्यांसाठी जम्मू-काश्‍मीरचे दरवाजे उघडले.

मोदींच्या चुकांमुळे लष्करी जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागत आहे. मोदी सर्जिकल स्ट्राईक, लष्कर, नौदल यांबाबत बोलतात. मात्र, लष्करी जवानांबाबत बोलत नाहीत. सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्यांच्या हितासाठी काय केले तेवढे तरी सांगा, असे आव्हान त्यांनी मोदींना दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त लष्करी जवानांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. वन रॅंक, वन पेन्शन (ओआरओपी) योजनेबाबत आम्ही मोदींवर विश्‍वास ठेवला. पण, आता आमची निराशा झाल्याचे त्यांनी मला सांगितले. ओआरओपीची अंमलबजावणी झाल्याचा दावा मोदी करतात. ते खोटे बोलत आहेत. ओआरओपीची अंबलबजावणी झाली नसल्याचे सेवानिवृत्त लष्करी जवानांचे म्हणणे असल्याचे राहुल यांनी म्हटले.

मोदींनी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी यांना देशाचे पैसे घेऊन देशाबाहेर पळून जाण्याची परवानगी दिली, असा आरोप करत राहुल यांनी केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनाही लक्ष्य केले. देशाबाहेर जाण्यापूर्वी मल्ल्याने जेटलींची 40 मिनिटे भेट घेतली, असे राहुल म्हणाले. मल्ल्याभेटीचा आरोप जेटलींनी याआधीच फेटाळून लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)