पंतप्रधान मोदींचे विचार दलित विरोधी -राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेसकडून आज देशभरात ‘संविधान बचाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. देशात आज दलितांवरील अत्याचार वाढत आहे. परंतु, देशाचे पंतप्रधान यासर्व प्रकरणावर मौन बाळगून आहेत. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित विरोधी असल्याचे सिद्ध होत आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली.

देशातील सर्व संवैधानिक संस्थांमध्ये आज आरएसएसच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत. देशातील गरीब, दलित आणि महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात होत असताना देशाचे पंतप्रधान गप्प कसे राहू शकतात ? असा सवालदेखील यावेळी राहुल गांधी यांनी केला. देशाच्या न्यायसंस्थेवर सरकारकडून घाला घालण्यात येत आहे. तसेच मोदींचे विचार हे दलित विरोधी असल्यामुळेच देशात त्यांच्यावरील अत्याचार वाढत असल्याचेही राहुल म्हणाले. यासाठी त्यांनी पुणे, उत्तरप्रदेश आणि देशातील इतर ठिकाणच्या घटनांचे उदाहरण यावेळी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)