पंतप्रधान निवासासमोर आंदोलन करणाऱ्या 50 तमिळ शेतकऱ्यांना अटक

नवी दिल्ली – देशभरात वेगवेगळ्या राज्यात कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलन होत आहेत. तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी ही मार्च-एप्रिल महिन्यात दिल्लीत आगळ्या -वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले होते. आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीत आले आहेत. रविवारी या शेतकऱ्यांनी निजामुद्दीन रेल्वे स्टेशनपासून लोक कल्याण मार्गापर्यंत मोर्चा काढला. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सहभागी झालेल्या पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान, मागील महिन्यात केलेल्या आंदोलनातून त्यांनी भारतातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली आहे. याचबरोबर सर्व शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचीही मागणी केली आहे. कावेरी वॉटर मैनेजमेंट बोर्डाच्या स्थापनेची मागणीही यावेळी करण्यात आली. 40 दिवस चाललेले हे आंदोलन 25 मार्च रोजी स्थगित करण्यात आले होते. त्यावेळी या शेतकऱ्यांनी आपण आंदोलनासाठी पुन्हा दिल्लीला येऊ असे सांगितले होते. त्यानुसार ते दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी आले आहेत. सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आंदोलन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)