पंतप्रधान निवासाऐवजी लष्कर सचिव निवासात राहणार इम्रान खान

इस्लामाबाद: शासकीय पंतप्रधान निवासात न राहता आपण लष्कर सचिव निवासात राहणार असल्याचे पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले आहे. लष्कर सचिव निवास 3 बेडरूम्सचा आहे. देशाच्या खर्चाप्रमाणेच्‌ आपण आपल्या वैयक्तिक खर्चातही बचत करणार असल्याचे आणि बानिगाला येथील माझ्या स्वत:च्या घरात मला राहायचे होते, पण गुप्तचर संस्थांनी माझ्या जिवाला धोका असल्याने मला तेथे न राहण्याचा सल्ला दिला असल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानात एका बाजूला लोकांसाठी खर्च करायला पैसा नाही, आणि दुसरीकडे काही लोग बादशाही थाटात जीवन जगतात. बचतीबाबत बोलताना इम्रान खान यांनी सांगितले की, पंतप्रधान निवासात 224 नोकर आणि 80 मोटर गाड्या आहेत, 33 बुलेटप्रुफ कार आहेत, हेलिकॉप्टर आहे, विमान आहे. पण मी फक्त 2 नोकर आणि 2 मोटरगाड्या ठेवणार आहे.

-Ads-

बाकी बुलेटप्रुफ कार लिलावात विकून टाकण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे. देशासमोर अनेक समस्या आहेत. बेकारी आणि भ्रष्टाचार या दोन समस्या दूर करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही इम्रान खान यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)