पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग शिखर बैठकीत येणार एकत्र

बीजिंग : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारावेत यासठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत संयुक्त परिषदेला संबोधित करताना चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली.

नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठक 27 आणि 28 एप्रिलला होणार आहे.  गतवर्षी झालेल्या डोकलामच्या तिढ्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.या परिषदेत संबोधित करताना चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले, “शांघाई सहयोग संघटनेचा (एससीओ)  सदस्य बनल्याबद्दल चीनकडून भारताला पुन्हा एकदा शुभेच्छा. तसेच एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मी चीनकडून स्वागत करतो.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)