पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंब्यासाठी मावळात उपोषण

वडगाव मावळ (वार्ताहर) – संसदेतील कामकाज चालू न दिल्याबद्दल विरोधी पक्षाचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीने गुरुवार दि. 12 रोजी मावळ पंचायत समिती चौकात मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या उपस्थितीत व भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या नेतृत्वाखाली 1 दिवस लाक्षणिक उपोषण केले.

संसदीय अधिवेशन सन्‌ 2017-18 चालू असताना कॉंग्रेस खासदार व संलग्न विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी अधिवेशनात अडथळा आणून संसदेचे अधिवेशन बंद पाडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अधिवेशनातून जनतेच्या अनेक प्रश्‍नांना येथोचित न्याय मिळत असतो. विरोधी लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नांना सकारात्मक उत्तर देण्यासाठी शासन सुसज्ज असते; परंतु अधिवेशनात अडथळे आणून कामकाज बंद पाडल्यामुळे जनहिताच्या अनेक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून संसदेत गोंधळ घालण्यापलिकडे विरोधकांनी काहीही केले नाही.

-Ads-

त्यामुळे विरोधी पक्षाचा धिक्कार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीने 1 दिवस लाक्षणिक उपोषण केले. भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, विशाल खंडेलवाल, नंदा सातकर, शोभा भेगडे, रजनी ठाकूर, सुमित्रा जाधव, राणी म्हाळसकर, दीपाली म्हाळसकर, अलका धानिवले, शेखर भोसले, भाऊ ढोरे, किरण राक्षे, अविनाश बवरे, सोमनाथ ढोरे, यदुनाथ चोरघे, कैलास पानसरे, संतोष दाभाडे, अनंता कुडे, शंकर शिंदे, सोमनाथ काळे, वसंत काळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)