पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योगा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक 3D व्हिडियो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते विविध योगासने सादर करत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील ट्वीट केला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे योगासन प्रेम सर्वश्रुत आहे. आपल्या अनेक भाषणात ते योगासन करण्याबद्दल मार्गदर्शन करतात. दरम्यान, फिटनेस आणि वेलनेस या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, असे रविवारीच मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)