पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अँजेला मार्केल यांची भेट

बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या युरोप दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. ते आज जर्मनीला पोहचले आहेत.  दरम्यान, जर्मनीला पोहचल्यानंतर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही देशातील सामायिक भागीदारीविषयी चर्चा केली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांनी म्हटले आहे.

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली असल्याचेही रविश कुमार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या भेटीच्या अगोदर अँजेला मार्केल यांनी मोदींचे स्वागत केले होते. पंतप्रधानांचा हा दौरा दोन्ही देशातील राजकीय भागीदारी आणखी मजबूत करणारा ठरणार असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)