पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजला कुमारस्वामींनी दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज पूर्ण करत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना चॅलेंज दिले आहे. मात्र, फिटनेस चॅलेंज स्वीकारण्याऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच पंतप्रधान मोदींना वेगळेच चॅलेंज देत टोला हाणला आहे.

”माझ्या आरोग्यप्रती पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केल्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. मात्र मला राज्याच्या फिटनेसबाबत अधिक चिंता आहे”, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. एवढंच नाही तर राज्याचे  फिटनेस सुधारण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पाठिंब्याचीही मागणी केली आहे.

-Ads-

दरम्यान, विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करत पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी योगाभ्यास करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, टेनिसपटू मनिका बत्रा आणि आयपीएस अधिकाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिले.

पंतप्रधानांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत कुमारस्वामी यांनी आभार व्यक्त केले. ”शारीरिकरित्या सुदृढ असणे महत्त्वपूर्ण आहे आणि मी या गोष्टीचे समर्थनही करतो. योग-ट्रेडमिल हे माझ्या दैनंदिन शारीरिक कसरतीमधील हिस्सादेखील आहेत. मात्र तरीही आपल्या राज्याच्या फिटनेसबाबत मला अधिक चिंता आहे आणि यासाठी मला तुमचंही समर्थन हवंय”, असे कुमारस्वामींनी ट्विटमध्ये म्हटलंय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)