पंतप्रधान मोदींचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

2018 हे वर्ष बॉलीवूडमध्ये आलेल्या बायोपिकमुळे गाजले होते. अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि संजू या दोन्ही मोठ्या सिनेमांनी बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कमाई केली. त्याशिवाय हॉकीपटू संदीप सिंहवर आधारीत सूरमा आणि नंदिता दास दिग्दर्शित मंटो या सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच यश मिळाले होते. बॉलीवूडमध्ये  सध्या बायोपिकचा चांगलाच ट्रेंड सुरु आहे.

यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिल्म ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्विटर एकाउंट या बाबत माहिती ट्विट केली आहे कि,पीएम नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बनविण्यात येत आहे. ‘मैरी कौम’ आणि  ‘सरबजीत’ यांसारखे चित्रपटाचे डायरेक्टर ओमंग कुमार हा चित्रपट डायरेक्ट करीत आहे. तसेच संदीप सिंह प्रोड्यूसर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार  या बायोपिकमध्ये विवेक ओबरॉय मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टर 7 जानेवारीला रिलीज होणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)