पंतप्रधान ग्रामसडक योजनेत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

पवनानगर, (वार्ताहर) – पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून, या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मोऱ्यांना पहिल्याच पावसात तडे गेले आहेत.

आर्डव-ब्राम्हणोली या रस्त्याचे काम हे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सुरू असून या रस्त्यासाठी तीन कोटी 48 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे; परंतु या रस्त्यासाठी नेमलेले ठेकदार आपल्या मनाप्रमाणे काम करत असल्याचे निदर्शनास येते. या रस्त्यावर पूर्वी असणाऱ्या मोऱ्या बदलून मोठ्या मोऱ्या टाकण्यात येत आहेत. या मोऱ्या बसविताना मोरीच्या दोन्ही बाजुूंना कॉंक्रीट भरून त्या पॅक करणे आवश्‍यक आहे. परंतु अनेक मोऱ्यांनी माती व मुरूमाच्या भराव करून बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात ब्राम्हणोली येथील मोरीला मोठे तडे गेले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करताना धोका निर्माण झाला आहे.

तसेच ज्या ठिकाणी मोऱ्यांची गरज नसताना देखील मोऱ्या बसविण्यात आलेल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारही केल्या आहेत. परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी रस्त्याच्या कामाकडे फिरकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या मोऱ्या पुन्हा काढून कॉंक्रीट करून बसविल्या नाही, तर ठेकेदाराला काम करू देणार नाही, असा इशारा पवन मावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर निंबळे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)