पंतप्रधानांनी मौन सोडावे – ओमर अब्दुल्लांची मागणी

श्रीनगर – कठुआ बलात्कार व हत्या प्रकरणात पंतप्रधानांनी आपले मौन सोडावे अशी मागणी जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. लोकांसाठी अत्यंत संवदेनशील ठरलेल्या या प्रकरणात आपण अजून मौन काळ बाळगले आहे असा सवाल त्यांनी मोदींनी उद्देशून केला आहे. या दुर्देवी मुलीला आपण दुर्लक्षित करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बकेरवाल मुस्लिम समुदायाच्या आठ वर्षीय मुलीवर करण्यात आलेला सामुहिक बलात्कार आणि तिची हत्या हा आता राष्ट्रीय विषय बनला असून त्यावर देशभरातील माध्यमांमधून मोठी चर्चा सुरू आहे. त्याचा व्यापक स्तरावर निषेधही केला जात असून या प्रकरणाला मिळालेल्या धार्मिक रंगामुळेही हे प्रकरण आता अधिक संवेदनशील होत आहे. या प्रकरणावर विविध पातळ्यांवरून टीका केली जात आहे पण पंतप्रधानांनी त्याविषयी अद्याप मौन बाळगले आहे. त्या संबंधात ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून थेट पंतप्रधानांना हे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)