पंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची हवाई पाहणी…

तातडीची मदत म्हणून पाचशे कोटी केले जाहीर
थिरूवनंतपुरम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त केरळची हवाईपहाणी केली. त्यानंतर त्यांनी या राज्याला तातडीची मदत म्हणून पाचशे कोटी रूपयांची रक्कम जाहीर केली आहे. या पूरात मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना त्यांनी प्रत्येकी दोन लाख रूपये आणि गंभीर रित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदतही मोदींनी यावेळी जाहीर केली.

मोदींनी जाहीर केलेली ही पाचशे कोटी रूपयांची मदत राजनाथसिंह यांनी 12 ऑगस्ट रोजी जाहींर केलेल्या शंभर कोटी रूपयांच्या मदती व्यतिरीक्त असेल असेही केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधानांसमवेत राज्यपाल पी सत्‌शिवम, मुख्यमंत्री पिनारी विजयन, केंद्रीय मंत्री अल्फोंस हेही हवाई पहाणी दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यांनी पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अलुआ आणि थ्रिुसर या जिल्ह्यांची हवाई पहाणी केली.

राज्य सरकारने केंद्राकडे तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रूपयांची मागणी केली होती. या राज्यात प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 20 हजार कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका अंदाज पाऊस उतरल्यानंतरच काढता येणार आहे. मोदींचे कोची येथे काल रात्रीच आगमन झाले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी पुरामुळे निर्माण झालेल्या स्थितीची व नुकसानीची माहिती देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)