पंतप्रधानांना ठार मारण्याचा कट?

स्फोटातील आरोपीचे टेलिफोन संभाषण तपास यंत्रणांच्या हाती
कोईमतुर – येथील साखळी बॉंम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेल्या एका आरोपीचे टेलिफोन संभाषण पोलिसांच्या हाती लागले असून त्यात त्याने एका कॉन्ट्रॅक्‍टरला आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची योजना आखत आहोत असे म्हटले आहे. या प्रकरणाचा आता कसून तपास हाती घेण्यात आला आहे.

मोहंमद रफिक असे यातील आरोपीचे नाव असून त्याला 1998 च्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणात शिक्षा झाली आहे. त्याने म्हटले आहे की प्रकाश नावाच्या एका वाहतुक कंत्राटदाराला केवळ घाबरवण्यासाठी आपण असे बोललो होतो. त्याचे हे टेलिफोन संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी काल रात्री रफिकला अटक केली. केवळ खोडसाळपणे आपण मोदींचे नाव घेऊन त्या कंत्राटदाराला केवळ घाबरवण्याचे काम केले आपला तसा उद्देश नाही असेही त्याने स्पष्ट केले आहे.

तथापी पोलिस या प्रकरणाचा सर्वंकष तपास करीत आहेत. त्या दोॅघांमधील हे संभाषण आठ मिनीटांचे आहे. यातील रफिक याला बॉंबस्फोट प्रकरणात झालेली शिक्षा भोगून तो सध्या बाहेर आला असून तो कन्याकुमारी येथे वास्तव्याला आहे. त्याने वाहतूक कंत्राटदाराशी केलेले बहुतांशी संभाषण वाहनांच्या कर्ज प्रकरणांशी संबंधीत आहे. पण या चर्चेत मध्येच त्याने एकदम आपण पंतप्रधानांना ठार मारण्याची योजना आखत आहोत असे म्हटल्याने मोठाच गदारोळ माजला आहे. आम्हीच आडवाणी यांना मारण्यासाठी 1998 साली कोईमतुरला बॉंब ठेवले होते असेही त्याने यात म्हटले आहे. या संभाषणाच्या प्रकरणाची तपशीलाने चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आता विशेष तपास पथक स्थापन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)