पंतप्रधानांच्या नावे देणगी गोळा करणाऱ्या सोसायट्यांविरोधात एफआयआर

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे देणग्या स्वीकारणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीविरोधात सीबीआयने “एफआयआर’ दाखल केली आहे. फरिदाबाद नोंदणीकृत सोसायटीमे “नरेंद्र मोदी विचार मंच’ स्थापन केला असून त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या “एफआयआर’ मध्ये म्हटले आहे.

या विचार मंचाचे अध्यक्ष जे.पी. सिंह यांच्यासह काही अज्ञात व्यक्‍तींविरोधात बेकायदेशीरपणे देणगी स्वीकारून नागरिकांची फसवणूक करण्याचा आणि पंतप्रधानांच्या नावाचा गैरवापर केल्याचे या “एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

जे.पी. सिंह यांनी “एनएमव्हीएमइंडिया. ओआरजी’ नावाची वेबसाईट सुरु केली असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही आहे. या वेबसाईटवर जे.पी. सिंह यांचा संस्थेचे अध्यक्ष म्हणून फोटो वापरण्यात आला आहे. या प्रकरणी जे. पी. सिंह यांच्यासह काही अज्ञातांविरोधात गुन्हेगारी कारस्थान आणि फसवणूकीचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)