पंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने आयबी सावध 

इंदूर (मध्य प्रदेश): पंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्यापूर्वी दोन इराणी गायब झाल्याने खळबळ माजली आहे. या संदर्भात पोलीसांनी आयबीला कळवले आहे. इंदूरच्या विजय नगर पोलीस स्टेशनजवळ असलेल्या एका हॉटेलात दोन इराणी 11 तारखेला उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच ते अचानकपणे आणि संशयास्पद प्रकारे गायब झाले आहेत. गायब झालेल्या इराण्यांचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले आहे.

विजयनगर येथील हॉटेल अतिथी येथे 11 तारखेला दोन इराणी राहायला आले होते. 14 नोव्हेंबर रोजी ते आपली रूम खाली करून हॉटेल सोडून निघून गेले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस तपासणी करत असताना ही गोष्ट लक्षात आली. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये फक्त डेनियल चे नाव लिहिलेले आहे. त्यांनी आपली कार्डे दाखवली होती, मात्र नंतर त्यांनी ती नकळ्त काढून घेतली, असे अतिथी चे व्यवस्थापक अतुल राजपूत आणि अजय गहलोत यांनी सांगितले आहे.

आग्रा येथे जाण्याबद्दल ते बोलत होते असे राजपूत यांनी सांगितले. दोन्ही इराण्यांचे इंदूरमध्ये येणे संशयास्पद होते, असे पोलीस उप अधीक्षक शैलेंद्रसिंह चौहान यांनी सांगितले आहे. या बाबतीत आयबी, एटीएस, एसटीएफ आणि क्राईम ब्रॅंचला कळ्वण्यात आले आहे. हॉटेल अतिथीचे मालक यांनी सांगितले की दोन्ही आरोपी कारने येत असत. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपास चालू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)