पंतप्रधानांकडून सव्वाशे कोटी जनतेची दिशाभूल – साठे

पिंपरी – स्थानिक पातळीवरील प्रश्न ते राष्ट्रीय प्रश्नांपर्यत भाजपाचे केंद्र व राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. देशातील बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्थेबाबत दिलेले एकही आश्वासन चार वर्षांत पूर्ण करता आले नाही. देशभर उडलेला कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, शंभरीकडे वेगाने वाटचाल करणारे पेट्रोलचे दर, केंद्रिय अधिवेशन चालवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन “पेड मुलाखत’ देऊन सव्वाशे कोटी जनतेची व माध्यमांची दिशाभूल करीत आहे, अशी टीका पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

शहर कॉंग्रेस पक्षाची बैठक रविवारी (दि. 22) संत तुकाराम नगर पिंपरी येथे घेण्यात आली. यावेळी लोक जनशक्ती पार्टीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सरिता सुनिल जामनिक, भारिप बहुजन महासंघाचे संघटक सचिव बाबूलाल वाघमारे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

या बैठकीस कॉंग्रेस प्रदेश सदस्य संग्राम तावडे, बिंदू तिवारी, राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, शहर पदाधिकारी हुरबानो शेख, विनिता तिवारी, ड. क्षितीज गायकवाड, लक्ष्मण रुपनर, तानाजी काटे, सुनिल राऊत, दिलीप पांढरकर, भाऊसाहेब मुगूटमल, वसंत मोरे, सज्जी वर्की, राजन नायर, बाबा बनसोडे, किशोर कळसकर, वामन ऐनिले, सतिश भोसले, युवकचे नरेंद्र बनसोडे, मयुर जयस्वाल, विशाल कसबे, हिरा जाधव, विरेंद्र गायकवाड, तुषार पाटील, रहिम खान, ईषाद अली, आनंदराव फडतरे, आबा खराडे, विश्वनाथ खंडाळे, बाबूलाल वाघमारे, दिपक जाधव, भास्कर नारखेडे, चंद्रशेखर जाधव, विष्णु खरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)