पंतप्रधानांकडून आकांक्षा काळे हिचे कौतुक

चार हजार सिंगापूर डॉलरचे बक्षीस पटकाविले

वाघोली- केंद्र सरकारच्या वतीने आयोजित भारत-सिंगापूर हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, कोथरूड महाविद्यालयातील आकांक्षा सुरेंद्र काळे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या संघामध्ये महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. भारत – सिंगापूर हॅकॅथॉन स्पर्धेचे केंद्र सरकारकडून दि. 12 व 13 नोव्हेंबर 2018 दरम्यान आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये दोन्ही देशांच्या 20-20 संघ सहभागी झाले होते. यामध्ये एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, कोथरूड (पुणे) महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांच्या संघाने सहभाग घेतला होता. यामध्ये आकांक्षा काळे (रा. वडगावशेरी), कुणाल खाडिलकर, राहुल बारहाते विद्यार्थी सहभागी झाले होते. आकांक्षा हिच्या नेत्रदीपक यशाबद्दल पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गणेश कुटे, हवेली भाजपा उपाध्यक्ष प्रदीप सातव, चारुशीला काळे, अजय पवार, राजकुमार सावरे, विश्‍वास पवार, प्रतिभा सावरे, आशुतोष पवार, रमेश बंडगर, आदिनाथ ढवळे, संदीप लिमगुडे आदींनी अभिनंदन केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
39 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)