पंतप्रधानपदावर जास्त काळ राहणार नाही -महातिर मोहम्मद

क्वालांलपूर: मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी आपण या पदावर जास्त काळ राहणार नाही म्हणजेच केवळ  एक किंवा दोन वर्षेच राहणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर पंतप्रधानपद अन्वर इब्राहिम यांच्याकडे सोपवले जाणार आहे. इब्राहिम सध्या तुरुंगात असून बुधवारी त्यांची सुटका होणार आहे.

आपले सरकार माजी पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्याविरोधात खटला दाखल करू शकते. रज्जाक हे कोटय़वधी डॉलर्सच्या घोटाळय़ात अडकले असल्याचा दावा महातिर यांनी केला. 92 वर्षीय महातिर यांनी मागील आठवडय़ात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता. यानंतर महातिर हे पंतप्रधान होणारे सर्वात वृद्ध नेते ठरले आहेत.

महातिर यांच्या नेतृत्वाखालील 4 पक्षांच्या विरोधी आघाडीने बारिसन नॅशनल आघाडीला पराभूत केले होते. तुरुंगातून सुटका झाल्यावर 70 वर्षीय अन्वर पंतप्रधान होतील, असे आश्वासन महातिर यांनी प्रचारावेळी दिले होते. महातिर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील अन्वर यांच्या पक्षालाच निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)