पंतप्रधानांच्या हस्ते आयपीबी बॅंकेचे 21 तारखेला उद्घाटन – 650 शाखा सुरू

नवी दिल्ली – या महिन्याच्या 21 तारखेला आयपीपी (इंडियन पोस्ट पेमेंट्‌स) बॅंकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

उद्घाटनानंतर आयपीपीबी (इंडियन पोस्ट पेमेंट्‌स बॅंक) च्या देशभरात 650 शाखांचे कामकाज सुरू होणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात आयपीपीबीची किमान एक तरी शाखा असणार आहे. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात आयपीपीबी सेवा पुरवणार आहे. अन्य बॅंकांप्रमाणेच आयपीपीबीमध्येही सर्व बॅंकिंग सुविधा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयपीपीबी हे देशातील सर्वात मोठे बॅंकिंग नेटवर्क बनणार आहे.

आयपीपीबीच्या 650 शाखांबरोबरच देशातील सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिसेसमध्येही बॅंक सेवा मिळू शकणार आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्व पोस्ट ऑफिसेस आयपीपीबीला जोडण्यात येतील. आयपीपीबीमध्ये तीन प्रकारची खाती सुरू करता येणार असून कोणत्याही खात्यात किमान “बॅलन्स’ ची अट असणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)