पंढरपूर: आषाढी यात्रेसाठी 3781 जादा बसेस

file photo

राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन; परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतली नियोजन बैठक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंढरपूर – राज्यातील विविध भागातून आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित व सुखकर प्रवासाठी राज्य परिवहन महामंळाकडून 3 हजार 781 जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासाठीही 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. बैठकीपुर्वी त्यांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेतले.

पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात राज्य परिवहन महामंडळामार्फत नियोजन आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी मंत्री रावते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाअधिकारी रामचंद्र शिंदे, एस.टी प्रांताधिकारी सचिन ढोले. सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, तहसिलदार मधुसूदन बर्गे, एस.टी.चे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील, महाव्यवस्थापक यांत्रिकी पावणीकर, उपमहाव्यस्थापक वाहतुकचे तोरो, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, श्रीमती अर्चना गायकवाड, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री रावते म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि. 21 ते 28 जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे 8 हजार कर्मचारी सेवा देणार असून या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात येत आहे. या बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उदघोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या दिवशी चंद्रभागा बसस्थानकावरुन गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी पोलीस विभागाने एसटी बसेससाठी राखीव वेळ ठेवावी. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही. त्यामुळे भाविकांना इच्छितस्थळी पोहचता येईल, अशा सुचना रावते यांनी याबैठकीत दिल्या. तसेच भंडीशेगांव येथील बाजीराव विहिर येथे शनिवार दि. 21 जुलैला होणाऱ्या रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी व येण्यासाठी चंद्रभागा बसस्थानक येथून 100 जादा बसेसची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पाहिजे तेथे जावून आरक्षण करुन येणार…

आषाढी यात्रेनंतर परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षण करावे. तसेच पंढरपूर येथील मठ, यात्री निवास, धर्मशाळा आदी ठिकाणी वारकरी व भाविक मुक्कामासाठी थांबले आहेत, अशा ठिकाणी महामंडळाचे कर्मचारी जाऊन प्रवाशांच्या मागणी नुसार पाहिजे त्या ठिकाणी जावून आगाऊ आरक्षण करुन देण्यात येणार आहेत. या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)