पंढरपूरमध्ये भाविकाला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्याचे निलंबन

पंढरपूर : पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात भक्ताला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशोक भंडगे असे निलंबित पुजाऱ्याचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी विठ्ठलाच्या मूर्तीला हार घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भक्ताला त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर मंदिर समितीने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आश्वासन दिले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत अशोक भंडगे निलंबित राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. दत्तात्रय सुसे असे या भाविकाचे नाव आहे. सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय हे गाभाऱ्यात पोहोचले, तेव्हा हार घालताना पुजाऱ्यांनी त्यांना रोखले, त्यामुळे झालेल्या वादानंतर पुजाऱ्याने कानशिलात मारल्याचा आरोप सुसे यांनी केला आहे. पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये भणगे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)