पंडित नेहरूंबाबत भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान…

जयपुर – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे बीफ खात असत त्यामुळे त्यांना पंडित म्हणता येणार नाही अशी मुक्ताफळे राजस्थानातील भाजपचे आमदार ग्यान देव आहुजा यांनी उधळली आहेत. अल्वार जिल्ह्यातील रामगडचे ते आमदार आहेत आणि ते वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले की नेहरू गांधी परिवारानेच सर्व सामाजिक समस्या निर्माण केल्या आहेत. ते बीफ आणि पोर्क मांस खात. पण कॉंग्रेसनेच त्यांच्या नावामागे पंडित ही उपाधी लावली. ते पंडित नव्हते असे ते म्हणाले.

इंदिरा गांधी यांच्यामुळेच राहुल गांधी हे नियमीत मंदिरांमध्ये जाऊ लागले आहेत असे विधान प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सचिन पायलट यांनी केले होते त्यांच्या विधानाचा प्रतिवाद करताना आहुजा म्हणाले की राहुल गांधी हे इंदिराजींबरोबर कधीही मंदिरात गेले नाहीत. आपले हे वक्तव्य खोटे ठरले तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसनेच देशाच्या राजकारणात जातीपातीचे राजकारण आणले त्यामुळे देशातील नेहरू गांधी परिवाराचे सगळे पुतळे पाडून टाकले पाहिजेत असे विधानही त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना केले. राहुल गांधींची मुंज कधी झाली ते अशोक गेहलोत, सचिन पायलट, गुलामनबी आजाद यांनी सांगावे असे अजब आव्हानही त्यांनी दिले. सन 2016 साली त्यांनी जेएनयु विद्यापीठाबाबत असेच एक वादग्रस्त विधान करून वादंग माजवले होते.

जेएनयु विद्यापीठ म्हणजे सेक्‍स आणि मादकद्रव्ये घेणाऱ्यांचा अड्डा बनला आहे तेथे रोज तीन हजार कंडोम आणि दोन हजार दारूच्या बाटल्या सापडतात असे ते म्हणाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)