“पंडित दीनदयाळ उपाध्याय’ पतसंस्था संरक्षण योजनेचा लोणावळ्यात शुभारंभ

लोणावळा – महाराष्ट्राला समृद्ध करायचा असेल तर महाराष्ट्रातील सहकाराला जोडधंदा जोडल्यास सहकारातूनच समृद्ध सहकार चळवळ उभी राहिल. बहुतांश पतसंस्था या संचालकांच्या नातेवाईक, हितसंबंधातील व्यक्तींना कर्ज दिल्यामुळे डबघाईला आल्या. काही नेस्तनाबूत झाल्या आहेत. सहकारी पतसंस्थांचा प्रगतीचा आलेख उंचावयाचा असेल, कर्ज देणे व वसुली संदर्भात कडक धोरण राबविले पाहिजे तरच त्या तरतील. कडक धोरण आणि ठेवीदारांना सवलती, नवीन अमूल्य योजना राबविल्यास ठेवीदारांचा पतसंस्थावरील विश्‍वास वाढेल, असा विश्‍वास सहकार, पणन वस्त्र उद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते. या वेळी देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टीस्टेट पतसंस्थांतील एक लाख रुपयांच्या ठेवींना संरक्षण देणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय’ पतसंस्था संरक्षण योजनेचा शुभारंभ लोणावळा येथे करण्यात आला. या वेळी काही पतसंस्थांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर, आमदार बाळा भेगडे, सहकार आयुक्‍त सतीश सोनी, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सहकार भारतीचे महामंत्री प्रा. उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, माजी आमदार दिलीप बनकर, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, फेडरेशनचे महासचिव शांतीलाल सिंगी, कार्याध्यक्ष राजूदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर, संचालक प्रकाश पोहरे, ऍड. अंजली पाटील, “सीईओ’ सुरेखा लवांडे आदी उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, सर्वसामान्य समाजातील ठेवीदारांना व अडअडचणींना कर्जासाठी आधारवड असलेल्या सहकारी पतसंस्था या संस्थेच्या संचालकांनी नातेवाईकांना कर्जे दिल्यामुळे गोत्यात आल्या होत्या. व येत आहे. संचालकांच्या या नियमबाह्य धोरणांमुळे ठेवीदार व नागरिकांचा पट संस्थावरील विश्‍वास उडाला आहे. संचालकांची मतलबी धोरणे ही सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे, असे सांगत यापूर्वी अनेक पतसंस्थेच्या संचालक व त्यांच्या नातेवाईकांनी पतसंस्थेतेतून मोठ्या प्रमाणात कर्जे घेऊन ती आमच्या सरकार विरोधी विचारांच्या सहकारी बॅंकेत होत्या. त्या बॅंकाही त्यांच्या संचालकांच्या धोरणामुळे डबघाईला आल्या व बंद पडल्या आहेत. अशा डबघाईला व बंद पडलेल्या बॅंकांमध्ये ठेवलेल्या ठेवी काढून देण्यासाठी अनेक जण आमच्याकडे येत आहे.

या वेळी चरेगांवकर म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात सहकार क्षेत्राविषयी समाजात अविश्‍वास निर्माण झाला. सहकार चळवळीला गत वैभव प्राप्त करून देणे हे आव्हान आहे. यासाठी संस्कारित कार्यकर्ते घडविण्याची गरज आहे.आपण चिंतन करून सहकार क्षेत्रात काही आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले. सहकार आयुक्‍त सोनी म्हणाले की, राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बॅंकापेक्षा पतसंस्था तळागाळापर्यंत पोहचल्या. यामुळे सामान्य नागरिकाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. महाराष्ट्राच्या विकासात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. राजूदास जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुदर्शन भालेराव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)