पंजाब नॅशनलमधील माजी मॅनेजर 24 वर्षांनी दोषी

5 वर्षे सक्‍तमजूरीची शिक्षा

नवी दिल्ली – कर्जप्रकरणातील गैरव्यवहारामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेच्या एका माजी व्यवस्थापकास विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तब्बल 24 वर्षे सुरू असलेल्या या खटल्यामध्ये दोषी आढळलेल्या व्य्वस्थापकास आणि अन्य तिघाजणांना तीस हजारी न्यायालयाने 5 वर्षे सक्‍तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय यासर्वांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

चरणजीत अरोरा, असे या प्रकरणात शिक्षा झालेल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या तत्कालिन व्यवस्थापकाचे नाव आहे. ते 1992 मध्ये बॅंकेचे व्यवस्थापक असताना हे प्रकरण दाखल झाले होते. याशिवाय सुशिल कुमार गुप्ता, नरेंद्र कुमार गुप्ता आणि मनोज कुमार गुप्ता यांनाही दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे सीबीआयचे प्रवक्‍ते आर.के. गौर यांनी सांगितले. यापैकी सुशिल कुमार गुप्ता हा पंकज फायनान्स ऍन्ड लीजिंग लिमिटेडचा संचालक आहे. तर त्याच्यासह अरोरा आणि इतरांवर गुन्हेगारी कारस्थानाचा आरोप होता.

सीबीआयने 1994 साली हे प्रकरण दाखल करवून घेतले होते. तेंव्हापासून त्याचा तपास सुरू होता. या प्रकरणातील आरोपींना न्यू बॅंक ऑफ इंडियाकडून 2 कोटी रुपयांच्या क्रेडिटचा फायदा झाला, असा निष्कर्श सीबीआयने काढला होता. न्यू बॅंक ऑफ इंडियाचे नंतर पंजाब नॅशनल बॅंकेत विलीनीकरण झाले होते. बनावट कागदपत्रांच्य आधारे 23.94 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यत आले होते. ज्या वाहनांसाठी हे कर्ज दिले गेले त्यासाठी आगोदरच कॉर्पोरेशन बॅंकेकडून कर्ज दिले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)