चंदिगड – प्रसिद्ध पंजाबी गायक परमिश वर्मा यांच्यावर आज काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. ही घटना मोहाली इथे घडली, असे पोलिसानी सांगितले. मोहालीच्या सेक्‍टर 91 मध्ये परमिश आणि त्यांचे मित्र कुलवंत सिंग चहल हे एका कार्यक्रमानंतर घरी परतत असताना हा हल्ला झाला.

हल्लेखोरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणापासून त्यांच्या कारचा पाठलाग केला होता. गोळीबार झाला त्यावेळी कारमध्ये परमिश यांचे सुरक्षा रक्षकही होते. सुरक्षा रक्षक आपल्या नियोजित ठिकाणी कारमधून उतरल्यानंतर हल्लेखोरांच्या कारने परमिश यांच्या कारला गाठले आणि हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांच्या जीवाला धोका नाही, असे मोहालीचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक कुलदीप चहल यांनी सांगितले.

परमिश यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.”गाल नहीं कधनाई’ या पंजाबी गाण्यामुळे परमिशना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)