पंजाब मध्ये भीषण रेल्वे दुर्घटना-50 पेक्षा अधिक ठार

चंडीगड (पंजाब/हरियाणा): पंजाबमधील अमृतसरजवळ भीषण रेल्वे दुर्घटना घडली असून त्यात 50 पेक्षा अधिक लोक मरण पावल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आलेली आहे. रेल्वे क्रॉसिंगजवळ रावण दहनाचा कार्यक्रम चालू होता. तो पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर जमलेल्या लोकांना वेगाने येणारी रेल्वे चिरडतच गेल्याचे लोकांनी सांगितले आहे. ही रेल्वे पठाणकोटवरून अमृतसरला येत होती.

अमृतसरच्या जोडा रेल्वे फाटकाजवळ (फाटक क्रमांक 27) रावण दहनाचा कार्यक्रम चालू असताना ही दुर्घटना घडली. येणाऱ्या रेल्वेचा वेग फार जास्त असल्याचे प्रत्यक्षदशींनी सांगितले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राज्याचे गृह सचिव, एडीजीपी कायदा आणि सुव्यवस्था यांना ताबडतोब घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. महसूल मंत्री सुखबीर सिंह सरकारिया यांनी घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंस्रत सिंह यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या परिवारांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)