पंजाबात कैद्यांच्या शिक्षेत एक वर्षांची सूट

चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंग यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध कारागृहांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व कैद्यांची शिक्षा एक वर्षांनी कमी करण्याचा निर्णय घोषित केला आहे. तशा आशयाची शिफारस त्यांनी राज्यपाल व्ही. पी. सिंह बदनोरे यांना केली आहे.

घटनेच्या कलम 161 अंतर्गत एखाद्या कैद्याची शिक्षा कमी करण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो त्यामुळे राज्य सरकारने तशी शिफारस राज्यपालांकडे केली आहे. राज्यातील कैद्यांच्या स्थितीबाबतचा विस्तृत अहवाल गृहमंत्रालयाने तयार करून तो मुख्यमंत्र्यांना सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याने अनेक कैद्यांना त्याचा लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)