पंजाबमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांच्या खुन्याला 9 वर्षांनी अटक

फिरोझपूर (पंजाब) – फिरोझपूरमधील ढोलेवाला गावातील एकाच कुटुंबातील लहान मुलांसह 7 जणांची हत्या करणाऱ्या खुन्याला पंजाब पोलिसांनी आज अटक केली आहे. फरारी असलेल्या मलुक सिंह याला जिरा पोलीस ठाण्याचे एसएचओ दविंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने अटक केल्याची माहिती फिरोझपूरचे एसएसपी प्रीतम सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मलुक सिंह याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती; परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत परावर्तित केली. सन 2009 मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर मलुक सिंह फरारी झाला होता.

फरारी झाल्यानंतरही सन 2011 मध्ये मलुक सिंहने अलाहाबाद बॅंकेवर दरोडा घालून 12 लाख 45 हजार रुपये लुटले होते. त्याच्यावर फिरोझपूरमध्ये 4 गुन्ह्यांची नोंद आहे आणि इतर जिल्ह्यांतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या 9 वर्षांत त्याने किती गुन्हे केले याचा तपास पोलीस करत आहेर.

खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या लेफ्टनंटचा भाऊ आहे. त्याने 1994 साली मलुक सिंहने वैयक्‍तिक वैमनस्यातून ढोलेवाला गावच्या एका कुटुंबातील 7 जणांची हत्या केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)