पंजाबमधील कॉंग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर

  • निवडणुकीतील आश्‍वासनाची पूर्तता

चंडीगढ  – पंजाबमधील शेतकऱ्यांसाठी आज कॉंग्रेस सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या महत्वाच्या आश्‍वासनाची पूर्तता कॉंग्रेसने पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर केली आहे.
पंजाब विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांचे 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज पूर्ण माफ करण्याची घोषणा केली. या कर्जमाफीचा लाभ राज्यातील 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळेल. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशपेक्षाही दुप्पट दिलासा आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांना दिला आहे, असा दावा यावेळी अमरिंदर यांनी केला. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णयही पंजाब सरकारने घेतला. त्यानुसार 3 लाख रूपयांऐवजी यापुढे 5 लाख रूपये इतकी मदत दिली जाईल.
दरम्यान, विधानसभेतून सभात्याग केल्याने कर्जमाफीच्या घोषणेवेळी विरोधी बाकांवरील भाजप आणि शिरोमणी अकाली दलाचे सदस्य उपस्थित नव्हते. त्यावरून अमरिंदर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांशी संबंधित मुद्‌द्‌यांवर मी भूमिका मांडत असताना विरोधी सदस्यांनी उपस्थित राहायला हवे होते, असे ते म्हणाले. पंजाबमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या आपचे सदस्य मात्र विधानसभेत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)