पंचायत समिती सदस्याचे सिनेस्टाईल अपहरण

बीड, दि. 20 (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चक्क पंचायत समिती सदस्याचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शिवसंग्राम संघटनेचे पंचायत समिती सदस्य बबन माने यांना मारहाण करुन त्यांचे जीपमधून अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी बीड शहरातील पालवण चौक भागात घडली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लिंबागणेश गणातून शिवसंग्राम संघटनेककडून विजयी झालेले बबन माने नियमित सायंकाळी पालवण चौकात फिरायला जातात. सोमवारी ते आले असता पांढऱ्या रंगाच्या जीपमधून 4-5 जण तिथे आले. त्यांनी माने यांना मारहाण करुन जीपमध्ये टाकले. जीप धानोरा रोडकडे गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगीतले. दरम्यान, याबाबत आमदार विनायक मेटे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ आणि त्यांचे पथक शोध घेत आहे. उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती यामागील कारण मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)