पंचमहाभूते आणि आरोग्य (भाग दोन )

  डॉ. श्रुती कुलकर्णी 

पृथ्वी तत्व 

पृथ्वीच्या पोटातून मिळणाऱ्या मातीतील विविध खनिजांचे उपचार तसेच विविध वनस्पतींच्या रूपात आपण अन्न ग्रहण करतो. अशा अनेक पद्धतींमध्ये पृथ्वीतत्व सामावलेले आहे. विविध रत्ने, स्फटिके यांचाही उपचार म्हणून उपयोग होतो. सर्वात महत्वाचे पृथ्वीतत्वानेयुक्‍त काय असेल? तर स्वस्त पण बहुगुणी असते ती माती. या मातीचे औषधी गुणधर्म अनेक आहेत. मातीपट्टी, मातीलेप, मातीमंजन, मातीचा वाफारा अशा विविध प्रकाराद्वारे नैसर्गिक पद्धतीने मातीचे उपचार होतात. मातीपासून केलेले दंतमंजन दातांचे आरोग्य राखते. करंगळीशेजारचे बोट म्हणजे पृथ्वीतत्व होय. पृथ्वीतत्वाला घेऊन केलेली सूर्यमुद्रा ही आपले शरीर संतुलित राखते. त्याचबरोबर मेंदू कार्यक्षम करते. तसेच अधूनमधून चप्पलांशिवाय मातीवर चालण्याचा आरोग्यास हितकारी आहे.

 आप किंवा जलतत्व 

आपल्या हाताचे पांचवे नाजूक बोट करंगळी म्हणजे जलतत्व. पाण्याला जीवन म्हटले आहे. पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. पाण्यामध्ये जबरदस्त हिलींग पॉवर आहे. शरीरातील सहा ते साडेसहा लीटर रक्‍त जे आपल्या शरीरातील विविध रक्‍तवाहिन्यांमधून वहात असते. त्यालाही जलतत्वच म्हटले जाते. जलतत्वाने वरूण मुद्रा केली जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असता होणारे विकार या मुद्रेने नाहीसे होतात. ही वरूण मुद्रा नेहमी करू नये. वेगवेगळ्या उष्ण थंड पट्टया, एनिमा, टबस्नान, बाष्पस्नान, मेरूदंड स्नान, स्थानिक वाफ अशा अनेक प्रकारांनी जलोपचार केले जातात. ही उपचार पद्धती खूप प्राचीन आहे.

अशाप्रकारे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभुतांची तत्वे आपल्या हाताची पाचही बोटे प्रतिनिधीत्व करतात. ज्यांचा मुद्रा प्राणायामात माध्यम म्हणून महत्तम उपयोग होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)