पंचगंगा प्रदूषण तात्काळ- पदयात्रेद्वारे हजारो ग्रामस्थांची मागणी

पंचगंगा प्रदूषण मुक्त जागर पदयात्रेचा समारोप

कोल्हापूर/ प्रतिनिधी – कोल्हापूरची पंचगंगा नदी उगमापासून संगमापर्यंत प्रचंड प्रदूषित झाली आहे. पंचगंगेचे प्रदूषण तात्काळ रोखले गेलं पाहिजे या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील हजारो नागरिकांनी गेल्या चार दिवसांपासून पंचगंगा प्रदूषण मुक्त जागर पदयात्रा काढली होती. या पदयात्रेचा समारोप आज कोल्हापुरात करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हापूर जीवन म्हणून जीची ओळख आहे ती म्हणजे पंचगंगा नदी …. ही पंचगंगा नदी गेल्यात काही वर्षापासून प्रदूषित झाली आहे याला प्रामुख्याने शहरातील सांडपाणी..औद्योगिक वसाहतीतून सोडलं जाणारं प्रदूषित पाणी…  साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी… हे घटक प्रामुख्याने कारणीभूत आहेत याची माहिती जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ आला असून देखील या घटकांवर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कागदी घोडे नाचावणे एवढिच कारवाई केली जाते. परंतु आज अखेर हे प्रदूषण रोखले गेले नाही यामुळे या प्रदूषणामुळे साथीचे रोग आजार मोठ्या प्रमाणावर ती पसरले गेले आहेत याचा सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात बसला आहे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती गेल्या 4 दिवासनापासून होण्यासाठी सुरू असणाऱ्या पदयात्रेची सांगता आज कोल्हापुरात झाली या पदयात्रेत दरम्यान प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक आणि आमदार उल्हास दादा पाटील यांनी केली आहे

कुरुंदवाड इथल्या पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमापासून सुरू झालेली ही यात्रा गेल्या चार दिवसापासून हातकलंगडे करवीर या भागातील पंचगंगेच्या प्रवाहात सोबत उगमापर्यंत पोहोचली या पदयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी नागरिक महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)