पंचगंगा नदी प्रदुषण रोखण्यासाठी नदी काठावरील गावांनी प्रयत्न करावेत -चंद्रकांत पाटील

 नदी काठावरील गावांनी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घेण्याची गरज 

कोल्हापूर – पंचगंगा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी नदी काठावरील शहरे आणि गावांनी त्यांच्याकडील सांडपाणी नदीमध्ये मिसळणार नाही, यासाठी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घ्यावा, यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापूर येथील पंचगंगा नदीघाट सुशोभिकरणाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.

समारंभास आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, प्रभारी वास्तु शास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नदीकाठावरील गावांनी साडपाणी व्यवस्थापनाचा विशेष प्रकल्प हाती घेवून प्रदुषण रोखण्याकामी मदत करावी, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंचगंगा नदीमध्ये होणारे प्रदुषण रोखण्यासाठी शहर वासियांनी आणि गावकऱ्यांनी सक्रिय योगदान द्यावे. नदीमध्ये प्रदुषण होणार नाही यादृष्टीने जनावरे धुणे अशी कृत्ये टाळण्याची खबरदारी घ्यावी.  नदीमध्ये प्रदुषण होणार नाही यासाठी खबरदारी घेवून पंचगंगा नदी स्वच्छ आणि प्रदुषण मुक्त कशी राहील याकामी शहर वासियांचेही योगदान मिळावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)