पंकजा मुंडे यांच्या आदेशानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

बीड दि. 19 (प्रतिनिधी) – खरीप व रब्बी हंगामाची मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात न वळवता संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बॅक खात्यात जमा करावी असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी पंकजाताई मुंडे यांनी दिल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने तातडीने विमा वाटपाची कार्यवाही पूर्ण केली. पंकजा मुंडे यांच्या या निर्णयामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रब्बी हंगाम 2015 साठी जिल्हयातील सर्व बॅकांमध्ये एकूण 5 लाख 21 हजार 41 शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 276 कोटी 15 लाख रुपये तर खरीप हंगाम 2016 करिता 4 लाख 91 हजार 32 शेतकऱ्यांना 209 कोटी 25 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती. मंजूर झालेल्या एकूण विमा रक्कमे पैकी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला रब्बी हंगामासाठी 4 लाख 34 हजार 201 सभासदांना 225 कोटी 12 लाख तर खरीप हंगामासाठी 3 लाख 77 हजार 717 सभासदांना 120 कोटी 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी मंजूर झालेली विम्याची रक्कम त्या – त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करता त्यांच्या कर्ज खात्यात वळती केली. परंतु पेरणीचे दिवस व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मुंडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅकेला विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे आदेश दिले. बॅकेने त्यांच्या आदेशानुसार तातडीने कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)