पंकजा मुंडेंचा मेटेंना धक्का

“शिवसंग्राम’चे राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर
बीड – भाजप सरकारचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्षाच्या विनायक मेटे यांना पंकजा मुंडे यांनी जोरदार धक्‍का दिला आहे. शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी विनायक मेटेंना शह दिल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद हातात असताना राजेंद्र मस्के यांनी पंकजा मुंडे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ठेवला. एरवी “आपले सर्वकाही विनायक मेटे’ असे सांगणाऱ्या राजेंद्र मस्केंनी यावेळी पंकजा मुंडेंची भव्य रॅली काढली. व्यासपीठावरच्या बॅनरसह सगळीकडे पंकजा मुंडेंचे होर्डिंग लावले होते.

तसेच बीड जिल्हा परिषदेत संख्याबळ कमी असतानाही शिवसंग्राम आणि शिवसेनेला सोबत घेऊन पंकजा मुंडेंनी सत्ता मिळवली. यात शिवसंग्रामच्या राजेंद्र मस्के यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेत उपाध्यक्षही बनवण्यात आले. जिल्हा परिषदेत सोबत असतानाही पंकजा मुंडे आणि मेटे यांच्यात राजकीय कुरघोडी कायम चालूच होती. याउलट राजेंद्र मस्केंची भाजपाशी जवळीकता प्रकर्षाने जाणवत होती.

राष्ट्रवादीच्या सुरेश धसांना भाजपात घेऊन आमदार बनवले, आता राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचीही भाजपाशी असलेली सलगी कायम समोर येत असते. आता राजेंद्र मस्केंच्या रुपाने पंकजा मुंडेंचे बेरजेचे राजकारण पाहायला मिळते आहे. म्हणूनच पंकजा मुंडेंनी राजेंद्र मस्केंच्या रुपाने एकीकडे मेटेंना धक्का दिला आहे. शिवाय आपली ताकदही दाखवून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)