न्यू मेक्‍सिकोमध्ये दहशतवाद्यांच्या तावडीतून 11 मुलांची सुटका

वॉशिंग्टन (अमेरिका) – न्यू मेक्‍सिको पोलीसांनी दहशतवाद्यांच्या तावडीतून 11 मुलांची सुटका केली आहे. गेले अनेक महिने दहशतवाद्यांनी या मुलांना बंधक बनवून ताब्यात ठेवले होते. या मुलांचा शोध पोलीसांना अगदी अचानकपणे लागला. तीन वर्षांच्या एका मुलाचा शोध घेत असताना पोलीसांना एका इमारतीत दोन दहशतवाद्यांसह ही 11 मुले सापडली. त्या ठिकाणी एआर 15 रायफल, 30 राऊंडची 5 मॅगेझिन्स आणि 4 पिस्तूलही मिळाली. या परिसरात दहशतवादी विचारधारणेचे अनेक लोक राहत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे गेला महिनाभर शोध चालू असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाच्या शोधात पोलीसांनी न्यू मेक्‍सिकोमधील एका जुनाट, मोडकळीस आलेल्या इमारतीवर छापा घातला. त्यात बंदी बनवलेली 1 ते 15 वर्षे वयोगटातील 11 मुले दोन दहशतवादी सापडले. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. ही सर्व मुले अत्यंत हलाखीच्या अवस्थेत होती, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी 3 महिलांना अटक करण्यात आली होती, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)