न्यू फलटण शुगर वर्क्‍सच्या विक्रीबाबत गोंधळ

प्रल्हाद साळुंखे पाटील यांच्यावर राजेंद्र काकडे यांचा आरोप
सातारा:ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍स या साखर कारखान्याच्या विक्रीचा निर्णय उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या मध्यस्थीने 151 कोटी रुपयांना ठरला आहे .मात्र आमच्याशी एकीकडे खरेदी खत केले असताना दुसरीकडे प्रल्हाद साळुंखे पाटील यांनी ही रक्कम कर्ज म्हणून उचलल्याची नोंद केली आहे,असा खळबळजनक आरोप, उद्योजक राजेंद्र काकडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला .ते म्हणाले या प्रकारामुळे आम्ही हा व्यवहार तात्पुरता थांबवला आहे.

येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रल्हाद साळुंखे पाटील व त्यांच्यात झालेल्या कारखाना विक्रीचा नोंदणीकृत दस्त त्यांनी सादर केला . 10 कोटी रुपयांची रक्कम बुधवारी (दि. 12) थेट शेतकर्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्याचे ठरले आहे. त्यानंतर लगेचच 41 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी सोमवारी आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर तातडीची बैठक घेऊन हा निर्णय निश्‍चित करण्यात आला होता . ही प्रक्रिया सुरू असताना प्रल्हाद साळुंखे हे दिशाभूल करत असल्याचा दावा काकडे यांनी केला .

मात्र कितीही अडचणी आल्या तरी कारखाना मीच घेणार . न्यू फलटण शुगर कारखान्यावर एकूण 239 कोटीचे कर्ज आहे. व प्रत्यक्ष विक्रीचा व्यवहार151 कोटींना झाला आहे . तरी पण असा कोणताच व्यवहार झाल्या नसल्याचे प्रल्हाद साळुंखे पाटील जे सांगत आहेत ते साफ चूक आहे . कारखाना खरेदी म्हणजे ही विधानसभेची तयारी म्हणायची का ? असे काकडे यांना विचारले असता ते म्हणाले राजकारणात यायचे की नाही हे अद्याप ठरलेले नाही . सध्या कारखाना खरेदीच्या प्रक्रियेत व्यस्त आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी (दि. 10) उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या दालनात न्यू फलटण शुगर वर्क्‍स (साखरवाडी)चे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील व संचालक धनंजय साळुंखे-पाटील यांच्यात व उद्योजक राजेंद्र काकडे यांच्यात व्यवहार ठरला. गुरुवारी (दि. 6) राजेंद्र काकडे यांनी तहसीलदार विजय पाटील यांच्यासमोर शेतकर्यांना 10 कोटी रुपयांची रक्कम आपण तातडीने देऊ, असे आश्वासन दिले होते. तद्नंतर हा व्यवहार कसा पूर्ण करायचा, यावर काथ्याकूट झाला. अखेर सोमवारी हा व्यवहार निश्‍चित झाला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी रविवारी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)