“न्यू फलटण शुगरवर्कस्‌’च्या चेअरमनसह संचालकांवर गुन्हा

लोणंद – सालपे येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी साखरवाडी कारखान्याने चेअरमन प्रल्हाद साळुंखे पाटील व संचालक मंडळावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालपे, ता. फलटण येथील भगवान मारुती शिंदे (वय 83) या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यावेळी शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून त्यामधे कारखान्याच्या बीलाविषयी उल्लेख केला होता.

या प्रकरणात शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर कारखान्याचे चेअरमन प्रल्हाद साळुंखे पाटील व संचालक मंडळावर भगवान शिंदे यांची मुलगी मंदा धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भगवान मारुती शिंदे यांनी आजार व ऊस घातल्या नंतरही साखरवाडी कारखान्याने बील दिले नसल्याच्या नैराश्‍यातून काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. कारखान्याने बील न दिल्यामुळे शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती. त्यानुसार आता साखरवाडी कारखान्याचे चेअरमन व संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे फलटण तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. भगवान मारुती शिंदे यांची न्यू फलटण शुगर साखर कारखान्याने साखर कारखान्याकडून नोव्हेंबर 2017 मध्ये तोडून नेलेल्या ऊसाचे पैसे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने या नैराश्‍यातूनच शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. आता भगवान शिंदे यांची मुलगी मंदा धुमाळ यांनी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)