न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रंगला दहीहंडीचा सोहळा

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) – येथील दहीहंडी फोडण्याचा सोहळा गोविंदा रे गोपाळा, अरे एक दोन , तीन, चार.. तुझ्या घरात नाही पाणी घागर रिकामी रे.. अशा दहीहंडीच्यासाठी असणाऱ्या खास गाण्यांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता. डोक्‍याला केशरी रिबीन बांधलेल्या बाल गोविंदांचा उत्साह अगदी आभाळाला भिडला होता.
शाळेच्या शिक्षिका सौ. रुपा शिंदे यांचेसह सर्व पाचवी वर्गाचे वर्गशिक्षकांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. दुपारी 3 चे सुमारास शाळेची ही दहीहंडी वरच्या मजल्यावर बांधल्यावर वातावरण अगदी गोविंदामय झाले होते. सर्व वर्गातील मुले- मुली मैदान परिसरात गोविंदाचा जयघोष करत होते. दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना मुलांना इजा होऊ नये यासाठी गाद्याही जमिनीवर टाकण्यात आल्या होत्या. एकामागून एक असे पाच प्रयत्न करुनही ही दहीहंडी फुटत नव्हती. अखेरीस सर्व बाल गोविंदांनी एकजूट करुन मैदानात गोल फेरी मारुन अगदी निग्रह करत तिसरा थर लावल्यावर बालकृष्णाचे रुप घेतलेला बाल गोविंदा अर्थात नचिकेत आवलेने शरीर उंचावत दहीहंडीच्या दोराला घट्ट पकडुन अखेर आपल्या डोक्‍यानेच दहीहंडी फोडली. आणि लाह्या, दही, दुधाचा अभिषेकच साऱ्या गोविदांवर झाला. हजारो मुला-मुलींनी गोविंदाचा जयघोष करत हा दहीहंडी सोहळा अनुभवला. इयत्ता पाचवी वर्गाचे वर्गशिक्षक विजय गुरव, मोरबाळे, काकडे,माने, मोरे, सौ. कुंभार, काळे आदींनी या सर्व गोविंदाना मार्गदर्शन केले. तसेच अगोदर सरावही करुन घेतला. गोपाळकाल्याच्या प्रसादाने या कार्यंक्रमाची सांगता झाली.
कार्यंक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र आफळे यांनी केली. या उपक्रमाचे संयोजनासाठी उपमुख्याध्यापक डी. एस. कांबळे, पर्यवेक्षक सौ. एस.व्ही पाटील, डी. जे. रावडे, एल.अे. दळवी, सेवानिवृत्त शिक्षक चारुदत्त दांडेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका, पालक प्रतिनिधी यांनी सहभाग घेऊन मुला-मुलींना मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)