न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पर्धेत यश

सातारा – रविवारी अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय सातारा या ठिकाणी भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत सातारा शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सामाजिक जाहिराती हा विषय देण्यात आला होता या स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

11 ते 15 वयोगटांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेला मिळाले. या स्पर्धेच्या जाहीर निकालानुसार चिरंजीव पारस विकास वंजारी (9 ह) याला प्रथम क्रमांकाचे बक्षिस सायकल व प्रमाणपत्र मिळाले तर द्वितीय क्रमांक कुमारी भूमिका संतोष दिवटे (8 ब) व तृतीय क्रमांक चिरंजीव मंदार महेश लोहार (6 फ) याने मिळवला या उज्वल यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक कलाशिक्षक घनश्‍याम नवले व संदीप माळी सर यांचे शालाप्रमुख स्नेहल कुलकर्णी, उपशालाप्रमुख दिलीप कांबळे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, लता दळवी व नीलम तिरमारे व शाळेतील शिक्षक शिक्षकांनी अभिनंदन केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)