न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात शाहू महाराज जयंती उत्साहात

शेवगाव – येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष व्याखायानाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी महापुरुषांचे समाज जीवनातील स्थान, राजर्षी शाहू महाराज यांच्या समाजकारणातील योगदान व सद्य राजकिय स्थितीत शाहूंच्या विचारांची गरज विषद केली. प्रत्येकाने शिवराय ते भिमराय वाचला पाहिजे व वाचून त्यांचे मनन करून चिंतन केले .
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची थोडक्‍यात माहिती प्रा. संदीप मिरे यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. मतकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाचा परिचय करून दिला. या व्याख्यानास उपप्राचार्य डॉ. आर. के. कासार व उपप्राचार्य डॉ. पी. आर. कुंदे यांनी उपस्थिती दर्शविली. या व्याख्यानास महाविद्यालयातील सर्व स्टाफ व भरपूर प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल देवढे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)